Monday, 29 August 2011

दूर कुठेतरी समुद्रकिनारी

दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यसोबतचे माझे आयुष्य
झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला आनंद अनुभवायचाय मला
तिचा चेहेरा पहात जगायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला
तुझी नि माझी जोडी अशी
जसे दोन डोळे सखे सोबती
मी वात तर तू पणती
हृदयात आहे तुझीच मूर्ती..

आठवणी सांभाळन खूप सोप्प असत,
कारण त्या मनात जपून ठेवता येतात,
पण क्षण सांभाळन खूप कठीण असत,
कारण क्षणात त्यांच्या आठवणी होतात...

मनातील तुझ्या विचारांना आवर कसा ग घालु,
तूच सांग अजून किती दिवस तुला नुसतंच स्वप्नात पाहू.
भेटशील कधीतरी याच आशेवर अजूनही मी ग जगतोय,
नजर का गर्दीत दरवेळी तुलाच जिथेतिथे शोधतोय.

वेळेचे काय आहे , वेळ तर काढावा लागतो
मग तो मैत्रीसाठी असो वा प्रेमासाठी
आयुष्य तर तसेही जगता येईल
पण मजा आहे ते जगण्यात तुझ्यासाठी
प्रत्येक श्वासात
तुझी आणि माझी नवी कहाणी
मागचा क्षण पुढच्या क्षणाला
जोडतो तुझ्या आठवणी

ही रात अशी का आली
मनी या वेड लावून गेली
जे गुपित होते दडविले
ओठांवर आणून गेली !

तुला आठवल की तो किनारा आठवतो
पायखालची ती ओली वाळूही आठवते
या आठवणींच एक छोटस गाव मी वसवतो
हे सार डोळ्यात घेऊन पापणी डोळ्यांना मिटवतो

कसा तुझा पाऊस
कसा तुझा पाऊस
मी इकडे तरसतो
आणि तो तिकडेच बरसतो
कसा तुझा पाऊस
तुला नखशिखांत भिजवतो
अन मला मात्र खिजवतो
कसा तुझा पाऊस
तुझ्या गालावरून ओघळतो
अन मी मात्र इकडे
कोरडाच विरघळतो
कसा तुझा पाऊस राणी
माझ्या मनात दरवळतो
क्षण एक तुझ्यासवे ...
चिंब चिंब भिजलेला
ओल्या ओल्या स्पर्शाने
अंगभर शहारलेला
...क्षण एक तुझ्यासवे ...
धुंद धुंद बरसलेला
आठवांच्या अंगणी माझ्या
पाऊस होऊन आलेला
क्षण एक तुझ्यासवे ...
उगीच थोडा संकोचलेला
येता मिठीत तू अशी
आकंठ तुझ्यातच बुडालेला
चांदण्यांची रात्र सजली,
आठवणीत तुझ्याच राणी ....
कधी फुलते हसू ओठी,
कधी डोळ्यांत जमते पाणी ....

खिडकीतला हा अवखळ वारा,
चाहूल तुझीच देतो राणी ....
कधी गंध तुझ्या तनुचा,
कधी तुलाच मिठीत आणी ....
पावसाची रिमझिम ओली,
चिंब करी तुला राणी ....
कधी ओला मी तुझ्यासवे,
कधी ओल्या जाणीवा मनी ....
तूच तू एक तुझेच सारे,
तुझाच मी पण झालो राणी ....
कधी गुंतलो कसा कुठे,
कधी हरवलो न ठावे सजणी ....
आसवांना किती काळजी
आपल्या शहाणपणाची
वेड लागू नये म्हणून
तसदी घेतात सांडायची

तो वेडा चंद्र एकटा आला माझ्या अंगणी,
काय म्हणू याला, तुझ्या येण्याची चाहूल की,
जागवायला रात्र सारी घेवून चांदणे आल्या तुझ्या आठवणी....
माझ्या आत कुठेतरी…
एक मी आहे ज्याचे प्रेम कोणाला कळत नाही
माझ्या आत कुठेतरी…
एक मी आहे ज्याला कोणी समजून घेत नाही
माझ्या आत कुठेतरी…
एक मी आहे जो कधी हसत नाही
माझ्या आत कुठेतरी…
एक मी आहे जो कधी रडत नाही
माझ्या आत कुठेतरी…
एक मी आहे जो कधी शांत बसत नाही
माझ्या आत कुठेतरी…
एक मी आहे जो कोणाला कळत नाही
माहीत आहे आठवणी तुझी जागा घेवू शकत नाही
पण त्याच्याविना मीही जगु शकत नाही
म्हणूनच तर .........
आठवणीची सोबत असताना मी एकटा कधीच नसतो
सोबत घेवून त्यांना गूपचूप गालात हसत असतो ....
...आणि त्यामुळेच..........
शेवटची भेट आपली आजही आठवते
पुन्हा पुन्हा मनाला तुझ्यासोबत पाठवते

Wednesday, 10 August 2011

ती म्हणाली मला
मला समजेल अस लिहित जा
तिच्या कडे बघत मनात म्हटल
तुझ्यावरतीच लिहिलेल असत
अग वेडे निट वाचत जा.....

*****************************************

मला एकदा थेंब व्हायचंय ......
तुला पाणी बनून स्पर्शून पहायचंय ...
मला एकदा थेंब व्हायचंय ......
तुझ्या गालावरून हळूच ओघळून पहायचंय.....
मला एकदा थेंब व्हायचंय ......
फक्त तुझ्यासाठी बनून रहायचय..........

*********************************************

चांदण्यांची रात्र सजली,
आठवणीत तुझ्याच राणी ....
कधी फुलते हसू ओठी,
कधी डोळ्यांत जमते पाणी ....

खिडकीतला हा अवखळ वारा,
चाहूल तुझीच देतो राणी ....
कधी गंध तुझ्या तनुचा,
कधी तुलाच मिठीत आणी ....

पावसाची रिमझिम ओली,
चिंब करी तुला राणी ....
कधी ओला मी तुझ्यासवे,
कधी ओल्या जाणीवा मनी ....

तूच तू एक तुझेच सारे,
तुझाच मी पण झालो राणी ....
कधी गुंतलो कसा कुठे,
कधी हरवलो न ठावे सजणी ....
आभाळ भरून आलं की
घट्ट येवून बिलगतेस
तू मला
आजही...
.
....
.
.
.

 
पाऊस यावा मोठा अन त्यात
तुझ्यासोबत भिजावस वाटत,
सुचत नसलं जरी काही
तुझ्याशी थोडतरी बोलावस वाटत.

...मी जगतोय तुझ्या आशेवर
मी जीवही देईन तुझ्यासाठी,
तू हसशील माझ्या भाषेला
पण शब्द हे रचतोय तुझ्याचसाठी.
 
 
<<<<<<<<<<<<<<<<<>>>>>>>>>>>>>>
 
आपल्या श्वासांची
लय पकडत
मग ................
...
..

एकसंध
बरसत
राहतो

वेडा
पाऊसही....

Tuesday, 2 August 2011

क्षण एक तुझ्यासवे ...

क्षण एक तुझ्यासवे ...
चिंब चिंब भिजलेला
ओल्या ओल्या स्पर्शाने
अंगभर शहारलेला

क्षण एक तुझ्यासवे ...
धुंद धुंद बरसलेला
आठवांच्या अंगणी माझ्या
पाऊस होऊन आलेला

क्षण एक तुझ्यासवे ...
उगीच थोडा संकोचलेला
येता मिठीत तू अशी
आकंठ तुझ्यातच बुडालेला

Monday, 1 August 2011

कसा तुझा पाऊस

कसा तुझा पाऊस
मी इकडे तरसतो
आणि तो तिकडेच बरसतो

कसा तुझा पाऊस
तुला नखशिखांत भिजवतो
अन मला मात्र खिजवतो

कसा तुझा पाऊस
तुझ्या गालावरून ओघळतो
अन मी मात्र इकडे
कोरडाच विरघळतो

कसा तुझा पाऊस राणी
माझ्या मनात दरवळतो

कसा तुझा पाऊस

कसा तुझा पाऊस
मी इकडे तरसतो
आणि तो तिकडेच बरसतो

कसा तुझा पाऊस
तुला नखशिखांत भिजवतो
अन मला मात्र खिजवतो

कसा तुझा पाऊस
तुझ्या गालावरून ओघळतो
अन मी मात्र इकडे
कोरडाच विरघळतो

कसा तुझा पाऊस राणी
माझ्या मनात दरवळतो

Thursday, 28 July 2011

प्रत्येक श्वासात
तुझी आणि माझी नवी कहाणी
मागचा क्षण पुढच्या क्षणाला
जोडतो तुझ्या आठवणी
प्रत्येक श्वासात
तुझी आणि माझी नवी कहाणी
मागचा क्षण पुढच्या क्षणाला
जोडतो तुझ्या आठवणी

शब्द फक्त शब्द असतात
आपण अर्थ लावत असतो ,
सरणारा क्षण कसा
शब्दाला वळण देत असतो


 
चोरून मी नेईल तुला
वेदना घेऊन मी काय करू
सुखात तर मी ठेवीन तुला,चल
नवीन आयुष्याची सुरुवात करू




आज तु डोळ्यात माझ्या,
अशी काही सामावालीस...
नकळत माझ्याच,
मलाच तु भावलीस...
स्वरूप आहे देखणं,
...आणि सुंदर आहे मन..
पाहता तुझे ते हास्य,
हरपून जाते भान...
 

Tuesday, 26 July 2011

तुझ्या बरोबर पावसात ......

तुझ्या बरोबर पावसात ......

धुंध पावसात तुझ्या अंग अंगाला खेटायला आवडेल...
त्या पावसाच्या थेंबानी अंग तुझे भिजवायला आवडेल...
भिजताना तुझ्या सोबत, तुला सांभाळायला आवडेल...
पाऊस कोसळताना तुझ्या खांद्यावर टेकायला आवडेल...
चिंब चिंब पावसात तुझ्या साथीने मला भिजायला आवडेल...
पावसाळी गारठ्यात तुझ्या हातांच्या उबेत राहायला आवडेल..
पावसाचे थेंब अंगावर झेलून , तुझ्यावर ओघळायला आवडेल...
चिंब पावसात तुझ्या बरोबर राहायला आवडेल...
वेड्या पावसात वेड्या सारखे संगे तुझ्या भिजायला आवडेल
एवढे नशीब मला सोडून , कोणाला मिळते तेच पाहायला आवडेल

Monday, 27 June 2011

ती आवडली मला,पण मी नाही विचारले तिला .....

ती आवडली मला,पण मी नाही विचारले तिला .....
नाही बोलणार माझ्याशी म्हणून नाही विचारले मी तिला,
चुकीच्या नझरेने पाहिलं ती मला, म्हणून नाही विचारले मी तिला,
एक गैरसमज करून घेईल ती माझ्या बद्दलचा, म्हणून नाही विचारले मी तिला,
समोर कसा जाणार मी तिच्या, म्हणून नाही विचारले मी तिला,
भेटून सुद्धा नाही भेटणार ती मला, म्हणून नाही विचारले मी तिला,

कोणाला सांगू हि शकणार नव्हतो, कि किती आवडते ती मला,
कसा सांगणार मी तिला, किती आवडते ती मला?
भीती वाटते त्या एका नाहीची, म्हणून नाही

राहू दे मला या गोड अश्या गैरसमजुतीत, कि,
'''मी आवडतो तिला'''
'''मी आवडतो तिला'''
'''मी आवडतो तिला'''

Wednesday, 22 June 2011

ती पावसात आणी मी......

ती पावसात आणी मी......
ऑफीसवरुन घरी निघायची वेळ
सगळेच अगदी घाईला टेकलेले, आणि
अचानक पाऊस बरसु लागला
त्याचे दिवसच आहेत म्हणजे तो बरसणारच…..
पण असा अचानक ??

इतक्यात “ती” दिसली
आणी वीज कडाडली, त्या क्षणभाराच्या प्रकाशात जणु परीच भासली
पाऊस तिच्या गालांवर अगदी थैमान घालत होता
ती मात्र त्याला साधा विरोधही करु शकत नव्हती

क्षणभर माझाही जळफळाट झाला….
तिने माझ्याकडे पाहिलं….
आणी पुन्हा एक वीज कडाडली
पण आभाळात नाही, हॄदयात….

ती जवळ आली
मी छत्रीत होतो, पण काय करु सुचेना….
एक मन म्हणतयं, तिला छत्रीत घ्यावं….
आणी दुसर ओरडतयं, तिच्या सोबत भिजावं….

“ती” मात्र असाच एक प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेऊन अजुन भिजतेच आहे….
अखेरी वाराच पडला मधे….
आणी माझ्या हातची छत्री हिसकावुन घेऊन गेला….
आता आम्ही दोघेही भिजतॊ आहोत….
ती पावसात आणी मी तिच्या भिजणाऱ्या रुपात ....................

हे काल पडलेले सुंदर स्वप्न होते माझे हे सकाळी जाग आल्यावर कळाले........... :(

Tuesday, 14 June 2011


गवताची पाती हिरवी होताना...
फुलपाखरे बागडताना..
आठवणींना मोहोर येताना...
हातात असतो... अर्धा प्याला...!!

आपणच आपले सावरताना
तुझ्या स्पर्श अनुभवताना
विश्वाचा सार्या विसर पडताना
हातात असतो... अर्धा प्याला...!!
रोज न चुकता
माझी नवीन कविता
तिला दाखवलेली
आणि आता एकही सुचत नाही
तर ....
...
कवितांची ही बाडं उचलून
अडगळीत टाकताना..
जरासं चिडताना,
स्वतःशीच हसताना
पुटपुटलो मनाशी..

इतका वेळ घेतात का कुणी
आय लव्ह यू म्हणायला

Sunday, 12 June 2011

बोलता बोलता काही जन रुसून जातात
चालता चालता हातातले हात सुटून जातात
म्हणतात कि प्रेमाची वाट नाजूक असते
इथे हसता हसता काही जन रडउन जातात

Thursday, 2 June 2011

मनाला मन जोडताना
क्षण क्षण जगताना
प्रत्येक श्वास घेताना
बघ माझी आठवण येते का.....

ती आवडली ,पण मी नाही विचारले तिला ....

ती आवडली ,
पण मी नाही विचारले तिला ....
.
.
delete करेल friend लिस्ट मधून ती मला,
म्हणून नाही विचारले मी तिला...
बोलणार नाही माझ्याशी ,
म्हणून नाही विचारले मी तिला...
.
.
चुकीच्या नजरेने पाहिलं ती मला,
म्हणून नाही विचारले मी तिला...
एक गैरसमज करून घेईल ती माझ्याबद्दल,
म्हणून नाही विचारले मी तिला...
.
.
सामोरे कसा जाणार तिला,
म्हणून नाही विचारले मी तिला...
भेटून सुद्धा नाही भेटणार ती मला,
म्हणून नाही विचारले मी तिला...
.
.
कोणाला सांगू हि शकणार नव्हतो कि
किती आवडते ती मला,
कसा सांगणार मी तिला कि
तू खूप आवडते मला.....?
भीती वाटते त्या एका नाही ची,
म्हणून नाही विचारले मी तिला...
.
.
अजून काही valentine day निघून जातील,
पण नाही विचारणार मी तिला.....
राहूदे मला या गोड गैरसमजुतीत कि,
आवडतो मी तिला...आवडतो मी तिला...आवडतो मी तिला..

Monday, 30 May 2011

कुणीतरी आहे ती ................

कुणीतरी आहे ती  ................
जी शब्दाविनाही माझे मन जाणणार
जगातले सर्वे सुख माझ्या पदरात टाकणार ------------------1

कुणीतरी आहे ती ................
जी कातरवेळी माझ्या मनास हळूच स्पर्शून जाईल
अन ओळख विचारताच नुसतीच  हसून देईल-------------------2

कुणीतरी आहे ती  ................
जी  स्वप्नांपालीकडील विश्व मला दाखवेल
आणी तिच्या  विश्वात रमताना मला स्वताचाहि विसर पडेल-------------------3

कुणीतरी आहे ती ................
जिच्याशिवाय सारे काही शून्य असेल
जिच्या सोबत सारे विश्वच स्वर्ग भासेल-------4

कुणीतरी आहे ती ................
जिचा असेल मला ध्यास
जिच्यासाठी जगण्याचा असेल माझा हव्यास .----------------5

कुणीतरी आहे ती  ................
जिच्या  प्रेमात मी असा  एकरूप होणार
जसे नदीचे पाणी सागरात विरघळणार-------------------6

कुणीतरी आहे ती  ................
जी  माझ्या पासून दुरावणार तर नाही ना
माझ्या आनंदी विश्वला संपवणार तर नाही ना--------------------7

अशीच कुणीतरी आहे ती  ................
जिची मी आतुरतेने वाट बघत आहे
माझ्या मनास का हि वेडी आशा छळत आहे ?------------------8

Friday, 27 May 2011

आठवणींचे पिंपळपान

वास्तवात भेटण्याची वेळ आमुची
नियतीने बहुदा ठरवली नव्हती
स्वीकारला होता निर्णय नियतीचा
नयनात मात्र प्रतिमा झळकत होती...

अनोखे बंधन आमुचे असे
जगास या कधी न कळले..
नयनात चेहरा ठेवुनी आम्ही
आठवणींचे पिंपळपान...आजही जपले....
************************************

तू अशीच आठवत जा
मी असेच लिहित जाईन
तुझ्या हरेक स्मृतीला
शब्दरूप मी देत राहीन


***********************
सतत नाराज आहेस काय विचारुन
मला नाराज करु नकोस
प्रश्नांची सरबती किती करशील
उत्तरांची अपेक्षा करु नकोस

Thursday, 19 May 2011

कधीतरी

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...

कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...

कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...

कधीतरी असा एक दिवस येइल,
प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...
पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,
कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...

कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...

कधीतरी तू मला असं वचन देशील?
पूढच्या जन्मी तरी माझी होशील?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,
आपण कोणावर तरी प्रेम करू शकलो यातच मग मला समाधान असेल...

-- तूझा आणि फक्त तूझा सनी

Wednesday, 11 May 2011

प्रेम आणि तू

ती माझ्या नजरेत नाही
पण डोळ्यात मात्र आहे...............
ती माझ्या स्वप्नात नाही
पण आठवणीत मात्र आहे..............
ती माझ्या सोबत नाही
पण हृदयात मात्र आहे...............
 
प्रेमाचे दुसरे नाव आहे विश्वास
तुझा प्राण तर माझं श्वास 
मी तुझ्यासाठी कुणीच नाही पण तू माझ्यासाठी आहे खास
म्हणूनच मी तूझा विश्वास आणि तू माझी आस
 
तुझ्या आठवणींच्या झाडाला
पुन्हा एकदा पालवी फुटतेय..
फळ म्हणून पुन्हा एकदा..
आसवेच बाहेर येऊ म्हणताय ...
 
 
मोहाच्या तळ्यात उतरताना मनाला कितीदा रोखतो
जाणीवाच्या पलिकडे जाऊन पुन्हा पुन्हा तेच करतो
 
मोहाच्या तळ्यात उतरताना मनाला कितीदा रोखतो
जाणीवाच्या पलिकडे जाऊन पुन्हा पुन्हा तेच करतो

Monday, 9 May 2011

तुझी आठवण

तुझ्या आठवणींच्या झाडाला पुन्हा एकदा पालवी फुटतेय..
फळ म्हणून पुन्हा एकदा.. आसवेच बाहेर येऊ म्हणताय ...


ही अखेरची तुझी आठवण
यापुढे माझ्या मनात
तुझे येणे जाणे असणार नाही...

यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं
माझ्या मनात बरसणार नाही.....

यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस
माझ्या मनाच्या अंगणात
रिमझिमणार् नाही....!

Friday, 6 May 2011

कधी वाटलंच नव्हतं..

जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..
अनोळखी नजरेनं अशा.. माझ्याकडे पाहशील..
पाहून नंतर.. हळूच मनाशी हसशील..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

...मनाच्या बागेत, भावनेचं रोपटं..
एवढ्या खोलवर जाईल..
मुळापासून उखडलं तरी..
थोडी आठवण शिल्लक राहील..
ती आठवण सुद्धा वेदनाच देईल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

तुझी निरागसता संपून..
निष्ठुरता डोळ्यांत उरेल..
माझ्या डोळ्यांत मात्र..
काकुळतीने.. पाणी तरेल..
भयाण हे स्वप्न, कधी वास्तवातही उतरेल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

ठसठसणारी वेदना..
तुझीच आठवण करुन देईल..
वेडं.. मनाचं पाखरु..
पुन्हा तुलाच शोधत राहील..
अवघड प्रयत्नानं त्याचा मात्र जीव जाईल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मी सुद्धा.. अडखळत..
पुन्हा उभा राहीन..
तुझ्या पलीकडे असणाऱ्या..
अंतिम ध्येयाला पाहीन..
आयुष्य पुढचे, त्याच्या चरणांवर वाहीन..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

आयुष्याच्या पानांवर पुढे..
प्रेमाचं पर्व अधुरंच राहील..
तुझ्या उल्लेखाशिवाय माझं जीवनसुद्धा..
अपुरंच जाईल..
मरताना सुद्धा ओठांवर तुझंच नाव घेत जाईन..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

Wednesday, 4 May 2011

पाऊस

चिंब भिजलेली ती,
अप्सरेहून सुंदर दिसते;
लाजून हळूच हसते,
अन काळजात घर करते...

जेव्हा जेव्हा पाऊस पडतो,
आठवणींचे दार उघडते;
तिच समोर दिसते,
अन मला चिंब करते.

Wednesday, 27 April 2011

दोन अश्रू.

विसरणं शक्य नसलं तरी,
आठवण तुझी काढणार नाही.
भारावून जरी गेलो तरी,
नयनी आसवं दाटणार नाही.

छळलंस किती तू मला तरी,
सवे तुज कोणी भांडणार नाही.
डोळ्यात उभे पाणी जरी,
थेंब एकही सांडणार नाही.

आग दु:खाची कोणत्याही,
अश्रूंच्या पाण्यानं विझत नाही.
तरीही दोन अश्रू पाझरल्याशिवाय,
मन मात्र हलकं होत नाही.

Tuesday, 26 April 2011

यालाच म्हणतात का प्रेम....?

यालाच म्हणतात का प्रेम....?
तिच्या आठवनींची वाढत जाणारी नशा,
आणि फक्त तिच्या अस्तित्वानेच खुलनारी प्रत्येक दिशा,


यालाच म्हणतात का प्रेम....?
तिची क्षणोक्षणी कासावीस करणारी चाहुल,
आणि हलुवार मला तिची आठवण करून देणार तीच पैजनाने सजलेल पाउल,

यालाच म्हणतात का प्रेम....?
तिचा मी अनुभवलेला बेधुंद श्वास,
आणि तिने वेड्या गप रे म्हणाव असा मला प्रत्येक क्षणी होणारा भास,

यालाच म्हणतात का प्रेम....?
तिच्या आठवणीने माझा कासाविस होणारा जीव,
आणि सर्वापेक्षा जास्त प्रेम करूनही तिला न येणारी माझी किव,

तिला जाणीव पण न होता माझ्या प्रेमाचा झालेला तिला स्पर्श,
कदाचीत यालाच म्हणत असतील प्रेम....!"

Monday, 25 April 2011

ती अन तीच

ती अन तिचा स्पर्श मला  उगाच सुखावतो ...
कदाचित तिच्या नकळत जास्त
ती अन तीच हसण मज उगाच हसवतो ...
कदाचित तिला आठवून जास्त

*************************************


रीता झाला माझ्या मनाचा काना कोपरा
मी मला कोठे शोधायचे ................
घेतल्यास कित्येक शपथा माझ्याच तु
शब्दांनी तरी किती खोटे वागायचे ..............

Saturday, 23 April 2011

वही

तुला आठवतय आपण
दहावीला होतो
आणि एकदा तु माझी एक वही
पहायला घेतली होतीस सहजच
कोरी होती ती
तु विचारलं होतस
काय लिहिणार आहेस या वहीत
मी नुसता   हसलो  होतो
तु पण हसलीस  आणि निघुन गेलीस
मी वही उघडली आणि
काही तरी लिहिलं पहील्या पानावर
तितक्यात एक मैत्रिण आली
आणि तिने सहज उघडलं वहीच
पहिल पान
आणि म्हणाली
.....ची वही तुझ्याकडे कशी आली?
माझ असणं माझ नसणं
तुझ्या लेखी कधीच नव्हत;
तरी माझ मन मात्र फ़क्त
तुझ्या आठवणीत रमतं.

Friday, 22 April 2011

असं प्रेम करावं........................

असं प्रेम करावं........................
थोड सांगाव थोड लपवावं,
असं प्रेम करावं.
थोड रुसावं थोड हसावं,
असं प्रेम करावं.
गपचूप गपचूप फोनवर बोलाव,
कोणाची नझर पडताच पटकन "अग" चा "अरे" कारावं.
असं प्रेम करावं.

ती वेळेवर आली तरी,
आपण जाणून बुजून उशीरच जाव.
तिचा खोटा रुसवा घालवण्यासाठी मग,
तिच्या कानाजवळ जाऊन SORRY म्हनाव.
असं प्रेम करावं.

वरवर तिच्या छोट्या छोट्या गोष्टीवर,
खूप हसून घ्याव.
"तू मला खूप आवडतेस"
हे मात्र तिला प्रत्येक वेळी सांगाव.
असं प्रेम करावं.

प्रेम हि एक सुंदर भावना,
हे सदैव जपाव,
पण त्या बरोबर येणाऱ्या वेदनांना पण,
हसतमुखाने सामोरे जाव.
असं प्रेम करावं.

विरह येतील संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील.
पण आपण मात्र खंभीर रहाव,
प्रत्येक परीक्षा पास व्हाव.
असं प्रेम करावं.

कितीही गेलोत दूर तरीही,
एकमेकांच्या कुशीत असाव.
तिला माझ्या डोळ्यात मला तिच्या डोळ्यात,
एकमेकावरच प्रेम दिसावं.
असं प्रेम करावं.
असं प्रेम कारावं........................

Thursday, 21 April 2011

तुझ्या आठवणी


माहीत आहे आठवणी तुझी जागा घेवू शकत नाही
पण त्याच्याविना मीही जगु शकत नाही
म्हणूनच तर .........
आठवणीची सोबत असताना मी एकटा कधीच नसतो
सोबत घेवून त्यांना गूपचूप गालात हसत असतो ......
आणि त्यामुळेच..........
शेवटची भेट आपली आजही आठवते
पुन्हा पुन्हा मनाला तुझ्यासोबत पाठवते
 
 

Tuesday, 19 April 2011

फक्त बोललीस येणार नाही
मी ही ते हसण्यावारी नेलं
खरचं तु परतलीसच नाही
सा-या आयुष्याचच हसं झालं

तुझे डोळे

डोळे तुझे किती मोहक, पण खोटं का बोलतात नेहमी
असून प्रेम माझ्यावर वेगळेच नाव सांगतात नेहमी
नाहीत अपेक्षा कि त्यांनी खरे बोलावे
नेहमी नेहमी पण एकदा तरी खोटे टाळून बघावे

Monday, 18 April 2011

आज पुन्हा तुला काहीतरी सांगावस वाटतय....

आज पुन्हा काहीतरी सांगावस वाटतय....
निशब्द त्या एकांताशी खुप खुप बोलावस वाटतय,
जुन्या त्या क्षणांना आठवुण पुन्हा गोंजारावस वाटतय.
डोळे भरून तुला पाहून तुझ्याबरोबर खुप हसावस वाटतय.
 
आज पुन्हा तुला काहीतरी सांगावस वाटतय....
दूर जाताना तुझ्यापासून आज मागे वळून पहावस वाटतय.
तुझ्या आठवणीमधे छोटस घर करून कायमच रहावस वाटतय,
आज खरच मला मनापासून मनातल तुला सांगावस वाटतय...."

Friday, 15 April 2011

तुझ्या माझ्या जुन्या आठवणी

तुझ्या माझ्या जुन्या आठवणी विसरायला शिकतोय,
आपल्या दोघांचे ते काही मोजके क्षण शब्दा शब्दाने प्रत्येकाला सांगतोय .
सांगताना आपली प्रत्येक आठवण गळा  माझा थरथरतो,
तुला प्रत्येक शब्दात लपवन्यासाठी शेवटपर्यंत मनापासून तळमळतो.


नवं काही करायचं
तर जुने दोर कापावे लागतात
ते दोर कापताना
आठवणी तितक्याच जपाव्या लागतात.


नुसता पाऊस म्हटला तरी
सगळं सगळं आठवत
आठवणींच्या पावसात भिजताना
तुझ्या आणखीन जवळ यायला होत

Thursday, 14 April 2011

आठवण

सांडलेल्या आठवणी
पुन्हा पुन्हा वेचताना
डोळ्यांनी का वाहावं
आठवणीत रमताना

संवाद चालला कि
वाद मनाचा मनाशी
डोकावून जेव्हा आठवण
तुझी गेली मघाशी

हळूच तूझी आठवण
मनात डोकावून गेली
काळजाचा मनाशी
संवाद घडवून गेली

तू परत येऊ नकोस

तू परत येऊ नकोस ,
जुन्या आठवणी जागवायाला ,
आधीच खुप दीवस लागलेत ,
मनावरी जखमा भरायला .........................

दुःख अंतरी दाबुन ,
एकांतमाधे रडत असतो ,
म्हणुन का कोणास ठाउक,
सर्वांसोबत हसत असतो .............

तू आयुशत परत येऊ नकोस,
तूजे सथान मीळवयाला,
आधीच फार वेळ लागलाय ,
तुझ्या आठवणी वीसरयाला .........

पण ,
काहीही असले तरी ........
तुला शोधयाला तरी ,
नजर माझी फीरत असते ,
आकाशात चद्र पाहील्यावर,
तुझीच आठवण दाटून येते .................

तुला विसर्नायाचा ,
अत्ता कुठे मी प्रयत्न करतोय ,
पण ही कवीता लीहता लीहता,
पुन्हा तुलाच ग़ मी आठवतोय ..................
तुझ्या आठवणीना मनातच कोंडतो फक्त तुला कळाव्यात म्हणून शब्दात मांडतो

Wednesday, 13 April 2011

परवाच ति मला भेटली...............

परवाच ति मला भेटली...............
ति मला जन्मोंजन्मीची साथीदार वाटली...............​.
तिच्या येण्याने सर्व आयुष्य पूर्ण झाले असे वाटले.............
पण तिला हे सर्व सांगायची हिम्मत मात्र नाही झाली ...............
कदाचित मी पण तिला पसंत असेल.............
या पलिकडे विचार करायची माझी हिम्मत नाही झाली....

आयुष्य आणि मैत्री

आयुष्य ही एक बासरी असते... ती हातात धरता आली पाहीजे...आपलेच ओठ,आपलेच श्वास....सुरात लावता आले पाहीजे......

रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात

ति नक्की येईल....

हे मन जिची वाट पाहत आहे
ति नक्की येईल....
तेव्हा......​तेव्हा
आभाळाला कंठ फुटेल ..
आणि, ढगांना सूर
ति येईल तेव्हा ...
आणि मागोमाग, वीजांचा नादमय ताल ..
एक नवीन गाणंच जणू ...
तिच्या पाऊलवाटेवर, तिच्या प्रत्येक पावलांपुढे ..
सरींचे असंख्य पडदे पडत जातील ....
ति येईल आणि ...
बहरतील रातराणी,
लाजेल मोगरा,
दवधुक्यात भिजून जाईल गुलाब,
आम्ही सारेच वाट बघत आहेत तिची ..
ति नक्की येईल............

जाणीव

कुणाला जाणीव ही नसते ,
कुणासाठी कुणीतरी झुरते,

कळीला त्रास होऊ नये म्हणून ,
एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते ,

किती त्रास द्यावा एखाद्याला ,
यालाही काही प्रमाण असते ,

आपल्यावरूनच विचार करावा ,
समोरच्यालाही मन असते ....

मी

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही

अबोल मौनरंग उलगडणारा...
गुलाबी थंडीत हळुवारपणे पाऊल टाकणारा...
काहीसा अलिप्त, आपल्याच नादात चालणारा,
एखाद्या मोहक, धीर गंभीर रागदारी प्रमाणे आपलं अस्तित्व दाखवणारा...
मुग्ध प्रेयसी सारखा...

तू

नको नको म्हणता आलीस तु
मनात माझ्या बसलीस तु
नको नको म्हणता गेलीस तु
वाट पाहणं उरलयं कधी येशील तु


माझ्या मनात तू
ध्यानात तू
वाट पाहतोय नेहमीच्या जागेवर
पुन्हा येशील का ग तू !!



फक्त बोललीस येणार नाही
मी ही ते हसण्यावारी नेलं
खरचं तु परतलीसच नाही
सा-या आयुष्याचच हसं झालं

सुंदर क्षण

काही क्षण फारंच सुंदर असतात,
ते मनाच्या गाभार्यात साठवायचे असतात,
काही गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात,
त्या फक्त आपल्या मनाशी बोलायच्या असतात

तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??????

बघ, तुझी आठवण घेउन...
पाउस पुन्हा येतोय...

तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??????
वारा कसा मंद मंद वाहतो...
मनाला कसा हलकेच स्पर्शुन जातो...

तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??????
सरी कशा थेंब थेंब बरसतात...
मनाला कशा चिंब चिंब भिजवतात...

ती आणि मी

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही


ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं


कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील


आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?
आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त

*******************************************

!!!! मी तुझ्याबरोबर खेळतो तेच मुळी हरण्यासाठी तुझ्या गालावरल्या खळीत हसु भरण्यासाठी !!!!

*******************************************
ती जाताना हळूच म्हणाली
माला विसरशील का रे

होता तेव्हा गला दाटला
गतित हरवले वारे
ती जाताना हळूच म्हणाली
मला विसरशील का रे

तुझ स्वप्नात येणं
मला स्वःतापासुन दुर नेन
खरचं ही जादु तुझी की
असचं असत प्रेम होणं
वाटत कधी कधी कोणीतरी आपलं असावं
जिच्यासोबत राहून माझं आयुष्य सुंदर खुलावं


जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देशील का?
माझ्या मनाच्या कोपऱ्यात
नयनांच्या माझ्या पापण्यात
थोडा वेळ विसावशील का ?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का

बघ तुला जमत का ??????

बघ तुला जमत का ??????
 
प्रत्येक वेळी मीच आठवन काढायला हवी का ?
बघ तुला आठवन काढायला जमत का ?
 
प्रत्येक वेळी मीच तुला भेटायला यायचे का?
कधीतरी तू येउन बघ जमते का?
 
प्रतेक वेळी मीच फुल द्यायला हव का?
बघ तुला मार्केट च्या गर्दीतून छानस फुल शोधता येत का ?
 
प्रत्येक वेळी मीच तुला मिठीत घ्यायचे का?
कधीतरी तू घेउन बघ जमते का?
 
प्रत्येक वेळी मीच call करायला हव का ?
बघ जरा तुला balance संपवायला जमत का......?
 
प्रत्येक वेळी मीच Sorry म्हणत तुझी समजूत काढायची का?
बघ तुला लाडी-गोड़ी लावायला येत का!!
 
प्रत्येक वेळी मीच माघार घ्यायची का?
कधीतरी तू घेउन बघ जमते का?
 
प्रत्येक वेळी समजुन घ्यायचे का ?
कधीतरी मला समजुन घे बघ जमते का?
 

आठवणी....

आठवणी....
कधी कधी खळखळणाऱ्या पाण्यासारख्या असतात,
कधी त्या गुणगुणताना मधेच न आठवलेल्या गाण्यासारख्या असतात.

आठवणी....
सतत हसनाऱ्या गोड गुलाबाच्या फुलासारख्या असतात,
कधी त्या निशब्द निरागस लहान मुलासारख्या असतात.

त्या आठवणी....
नकळतच तळहातावर आलेल्या घामासारख्या असतात,
नको असतानाही मिळालेल्या रटाळ कामासारख्या असतात.

आठवण

क्षणोक्षणी आठवण येते अन जाते
या आठवणिला तरी काही कळते
कधी त्रास देते तर कधी छळते
कधी पाकळ्यांप्रमाणे गळते
तर कधी फ़ुलाप्रमाणे फ़ुलते
ही आठवण अशी का वागते
जणू सुखद क्षणांमधून चमकते
कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते

मला कधी वाटतं.........

मला कधी वाटतं.........
तुझ्या मनात मी शिरावे
कोप-यात लपुन बसावे
तुझ्या कल्पना चोरुन घ्याव्या
माझ्या कविताहि तुझ्यासारख्याच व्हाव्या