Thursday, 28 July 2011

प्रत्येक श्वासात
तुझी आणि माझी नवी कहाणी
मागचा क्षण पुढच्या क्षणाला
जोडतो तुझ्या आठवणी

शब्द फक्त शब्द असतात
आपण अर्थ लावत असतो ,
सरणारा क्षण कसा
शब्दाला वळण देत असतो


 
चोरून मी नेईल तुला
वेदना घेऊन मी काय करू
सुखात तर मी ठेवीन तुला,चल
नवीन आयुष्याची सुरुवात करू




आज तु डोळ्यात माझ्या,
अशी काही सामावालीस...
नकळत माझ्याच,
मलाच तु भावलीस...
स्वरूप आहे देखणं,
...आणि सुंदर आहे मन..
पाहता तुझे ते हास्य,
हरपून जाते भान...
 

No comments:

Post a Comment