Monday, 29 August 2011

प्रत्येक श्वासात
तुझी आणि माझी नवी कहाणी
मागचा क्षण पुढच्या क्षणाला
जोडतो तुझ्या आठवणी

ही रात अशी का आली
मनी या वेड लावून गेली
जे गुपित होते दडविले
ओठांवर आणून गेली !

तुला आठवल की तो किनारा आठवतो
पायखालची ती ओली वाळूही आठवते
या आठवणींच एक छोटस गाव मी वसवतो
हे सार डोळ्यात घेऊन पापणी डोळ्यांना मिटवतो

No comments:

Post a Comment