Monday, 29 August 2011

क्षण एक तुझ्यासवे ...
चिंब चिंब भिजलेला
ओल्या ओल्या स्पर्शाने
अंगभर शहारलेला
...क्षण एक तुझ्यासवे ...
धुंद धुंद बरसलेला
आठवांच्या अंगणी माझ्या
पाऊस होऊन आलेला
क्षण एक तुझ्यासवे ...
उगीच थोडा संकोचलेला
येता मिठीत तू अशी
आकंठ तुझ्यातच बुडालेला

No comments:

Post a Comment