Monday, 18 April 2011

आज पुन्हा तुला काहीतरी सांगावस वाटतय....

आज पुन्हा काहीतरी सांगावस वाटतय....
निशब्द त्या एकांताशी खुप खुप बोलावस वाटतय,
जुन्या त्या क्षणांना आठवुण पुन्हा गोंजारावस वाटतय.
डोळे भरून तुला पाहून तुझ्याबरोबर खुप हसावस वाटतय.
 
आज पुन्हा तुला काहीतरी सांगावस वाटतय....
दूर जाताना तुझ्यापासून आज मागे वळून पहावस वाटतय.
तुझ्या आठवणीमधे छोटस घर करून कायमच रहावस वाटतय,
आज खरच मला मनापासून मनातल तुला सांगावस वाटतय...."

No comments:

Post a Comment