Tuesday, 14 June 2011

रोज न चुकता
माझी नवीन कविता
तिला दाखवलेली
आणि आता एकही सुचत नाही
तर ....
...
कवितांची ही बाडं उचलून
अडगळीत टाकताना..
जरासं चिडताना,
स्वतःशीच हसताना
पुटपुटलो मनाशी..

इतका वेळ घेतात का कुणी
आय लव्ह यू म्हणायला

No comments:

Post a Comment