Thursday, 2 June 2011

ती आवडली ,पण मी नाही विचारले तिला ....

ती आवडली ,
पण मी नाही विचारले तिला ....
.
.
delete करेल friend लिस्ट मधून ती मला,
म्हणून नाही विचारले मी तिला...
बोलणार नाही माझ्याशी ,
म्हणून नाही विचारले मी तिला...
.
.
चुकीच्या नजरेने पाहिलं ती मला,
म्हणून नाही विचारले मी तिला...
एक गैरसमज करून घेईल ती माझ्याबद्दल,
म्हणून नाही विचारले मी तिला...
.
.
सामोरे कसा जाणार तिला,
म्हणून नाही विचारले मी तिला...
भेटून सुद्धा नाही भेटणार ती मला,
म्हणून नाही विचारले मी तिला...
.
.
कोणाला सांगू हि शकणार नव्हतो कि
किती आवडते ती मला,
कसा सांगणार मी तिला कि
तू खूप आवडते मला.....?
भीती वाटते त्या एका नाही ची,
म्हणून नाही विचारले मी तिला...
.
.
अजून काही valentine day निघून जातील,
पण नाही विचारणार मी तिला.....
राहूदे मला या गोड गैरसमजुतीत कि,
आवडतो मी तिला...आवडतो मी तिला...आवडतो मी तिला..

No comments:

Post a Comment