Tuesday, 11 December 2012

तुझ्याच साठी..

कधी आयुष्यात आलीस अन
कधी माझी सवय झालीस काही कळलेच
नाही..
एक एक दिवस जात होता .. अन एक एक
आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात
होती ..
कदाचित तुला मी वेडा वाटत असेन.. अन
होय मी वेडाच आहे तुझ्याच साठी..
तुझ्या एका प्रेमळ कटाक्षासाठी..
तुझ्या प्रेमळ मिठी साठी..


नीट पहिलेहि नसशील, तू मलाडोळे भरून,
 तरी तू  छळते मला का, रोज स्वप्नी येऊन?

 

Tuesday, 4 September 2012

आठवणी आठवण्यासाठी असतात की विसरण्यासाठी.

आठवणी आठवण्यासाठी असतात की विसरण्यासाठी.
कीती पाखंरे जळाली गुढ हे उलगण्यासाठी
की ज्योत जळण्यासाठी आहे की जाळण्यासाठी
रडणा-या तुला रडण्याचा अर्थ कुठे माहीत
अश्रुं रडण्या-यासाठी आहेत का रडवण्या-रासाठी.

कीती चादंण्या जागतात उत्तर हे शोधण्यासाठी
की सुर्य उगवण्यासाठी आहे की मावळण्यासाठी
जागणा-या तुला जागण्याचा अर्थ कुठे माहीत
डोळे झोपण्यासाठी असतात का आसवे गाळण्यासाठी.

कीती किनारे झीजुन गेले सागराच्यां लाटांसाठी
की लाटा सागरासाठी असतात की किना-यासाठी
भरती आहोटीच कारणं कोणाला कुठे माहीत
भरती सागरासाठी असते का सागर भरतीसाठी

कीती कविता केल्या मीही तुझ्या विरहासाठी
की विरहं भेटीसाठी असतो का भेट विरहांसाठी
आठवणा-या तुला आठवणीचां अर्थ कुठे माहीत
आठवणी आठवण्यासाठी असतात की विसरण्यासाठी

Saturday, 25 August 2012

पाउलवाट

त्याला आठवते ती पाउलवाट
तळयाजवळची... तळ्याकाठची.....
सापाच्या शेपटीसारखी
नि ते गर्द निळे पाणी
त्यात उतरलेले आभाळ
पांढरा शुभ्र ढग
कधी सोबत ती

बिलगलेली....

...
ती पाउलवाट
असते नव्याने जन्मलेली
पण सोबत ती नसते
ती असते अस्तित्वाच्या पलीकडे
तो उभा तळ्याकाठी
त्याचेच प्रतिबिंब बघत
ती दिसतेय का..?
बिलगलेली....
कमीत कमी
त्या निळ्या निळ्या पाण्यात
पाण्याच्या भिंगात ...
आजही आठवतात ते क्षण..

तुझ्या सहवासातले,

कधी मी नजर चोरलेले,

तर कधी तू लपून पाहिलेले...



माहितीये मला कि तुझ्या हृदयावर आता दुसऱ्याच कोणाचा अधिकार आहे
पण माझ्या त्या गोड आठवणीतल्या तुझ्यावर फक्त माझाच अधिकार आहे ....



स्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते,
जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात,
तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत....



काहीतरी चुकतंय पण काय
सगळं निट सुरळीत सुरु असतांना
मन कशात तरी राहिलंय हरवलंय
आयुष्याची पहिली सुरुवात असतांना



जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल


 

नात मैत्रीचं ...

नात मैत्रीचं ...
ना रक्ताच ना वचनात अडकलेलं
ना ठरवलेलं ना ठरवून केलेलं
नात मैत्रीचं ... ...

मन मोकळ्या मनाचं ..
विचार स्वातंत्राच ..
हव ते बोलण्याचं .
नात मैत्रीचं ... ...

...
कधीच न तुटणार ..
तुटल तरी जुडणार ..
जीवनाचं अर्थ सांगणार ...
नात मैत्रीचं ... ...

आजन्म सोबतीच ..
एका हाकेच ..
सुख दुक्खाच ...
आपल्या हक्काचं...
नात मैत्रीचं ... ...

प्रतिक आरशाच ..
जुळ्या भावांच ...
एकाला ठेच ...
दुसऱ्याला लागायचं ...
नात मैत्रीचं ... ...

जगायला शिकवणार ...
पाठीशी उभ राहणार ...
सर्व चुका माफ करणार...
दिलदार म्हणवणार ...
नात मैत्रीचं ... ...

१ सांगणार १० ऐकवणार ..
नात मैत्रीचं ...

Monday, 11 June 2012

सागर किनारी या चांदण्या राती..........
सागराची गाज कानावरी येती..........
आठवण तुझी येता मनात वादळ उठती........
वादळ हे शमवायला पावसाची धार लागती..........

पाउस




वातावरण हे इतके सुंदर
अलगड खाली झुकते अंबर
आकाशाच्या छताला  जणू
पावसाच्या थेंबांचे झुंबर !

हळूहळू थंबू लागते पावसाची गाडी
सुन्न होऊन बघत बसते हिरवीगार झाडी
हा पाऊस  जातो कुठे, काही कळत नाही
पुढच्या पावसाची वाट पाहणे,
याशिवाय काही पर्याय उरत नाही !

पावसाच्या मनातलं मला काही कळत नाही..

पावसाच्या मनातलं मला काही कळत नाही..
तो बरसतोय अन तिची आठवण काही सरत नाही..

त्याला म्हटलं, टळ की लेका,त्रास का देतोस
तुझी रिमझिम तिची चाहूल काही विसरू देत नाही

तो वाफ़ाळता कप, त्या खिडकीतल्या गप्पा
ते ओलेचिंब भिजणे,डोळ्यांना काही हसू देत नाही

म्हणतो आता जादू बघ, अन हसला गडगडाटी
दारावर टकटक झालं अन पाहतॊ तर ती उभी होती
हसली खुदकन अन ओलेतीच येउन बिलगली
आणि ओढतच मला पावसात घेउन गेली

स्वप्न होते कि हे खरेच घडले होते हेच मुळी कळत नाही
खरंच पावसाचं मला काही कळत नाही
तो सरलाय आता पण तो क्षण काही सरत नाही

मैत्रीच्या पावसात

मैत्रीच्या पावसात
काल म्हटलं पावसाला,
माफ कर बाबा,
आज भिजायला जमणार  नाही.

मैत्रीच्या पावसात भिजून
झालोय ओलाचिंब.

न्हा‌ऊ घालतोय बघ  मला
शुभेच्छांचा प्रत्येक थेंब

मित्रांची इतकी गर्दी झालीय
भिजून  भिजून बघ मला सर्दी झालीय

पा‌ऊस रिमझिम हसला.
ढगांना घे‌उन क्षितीजावर  जाउन बसला.

जाता जाता म्हणाला,
"काळजी नको. भिजून घे खूप.
भिजणं  थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब ...!

Monday, 21 May 2012

हि रात्र

हि रात्र
हि रात्र मुली येतेय असंख्य स्वप्नांची फुलं घेऊन ..
अन गंध पसरतोय तुझ्या माझ्या मनात...

रातराणीच्या नाजूक गंधावर मात करत..
..हि रात्र दरवळू लागलीये ..

काजवे तार्यांशी स्पर्धा करू पाहतायत ..
पण तुझ्या नेत्रांतील चामकेशीही नाही..!

चंद्रकोर नेहमीप्रमाणेच हसतेय ..
पण तुझ्या मंद हसण्याचा कारण कळत नाही..
अन हि रात्र तुझ्यासह हसू लागली आहे ..

हि रात्र आता गडद होत चालली आहे..
तू असा माझा हात धरलास ...
..अन भर थंडीत हे शहारे उमटवलेस ...
..श्वास दुणावले ... पण क्षणभरच...!

आता मात्र.तूझ्या गुंफलेल्या बोटांत ..
...हवीहवीशी उब जाणवतेय..

वारा खेळतोय तुझ्या केसांवर ..
..अन तुझे केस माझ्या चेहऱ्यावर ..!
तू हळूच केस बांधून घेतेस..
..पण मी दुखावतो..
हि रात्र अशीच निशब्द राहू देत ..
मनाचा मनाशी संवाद चालू देत ..

..माझ्या खांद्यावर डोकं टेकवून डोळे मिटशील ...
-तुझा चेहरा फुलण्याची वाट बघत...
मी चेहरा निरखत राहीन.......................................

Wednesday, 16 May 2012

ती माझ्याशी बोलायची,

 

ती माझ्याशी बोलायची,
रोज गोड हसायची,
कधी कधी माझी
वाट बघत थांबायची....

दुसरी एकही मुलगी
माझ्याशी कधी बोलायची नाही,
ही पोरगी मात्र
माझी पाठ कधी सोडायची नाही....

तिच्या आयुष्यातल्या गमती
ती रोज मला सांगायची,
मी नवी लिहिलेली कविता
सारखी वाचायला मागायची....

एकदा मला म्हणाली
"तू माझ्यावर कध्धीच कविता करत नाही !"
तेव्हा मला समजलं....
तिला माझी एकही कविता कळत नाही

तो आणि ती

 

तो

नुसते सुचक बोलत राहतेस
पण प्रेम व्यक्त करत नाहीस
मी बोलायची वाट पाहतेस
स्वता काही बोलत नाहीस

माझ्यावर प्रेम करतेस तर
सान्गत का नाहीस एकदा मला
माझ मन जाणतेस तरी
कसली भीती वाटते तुला

पत्र अगदी प्रेमळ लिहीतेस
आणि म्हणतेस फ़क्त मेत्री आहे
पण खर काही वेगळच आहे
याची मला पुर्ण खात्री आहे

आता सोड ना हे लाजण तुझ
अन हाक दे माझ्या प्रेमाला
मनातले शब्द मनातच ठेवतेस
का छळतेस अशी सान्ग मला

ती

पुष्कळदा ठरवतेस सान्गाव तुला
पण मला धीरच होत नाही
मनातल सार मनातच राहत
ओठान्वर काही ते येत नाही

अशी कशी मी हाक देऊ
सोप वाटतय का ते तुला
जगाची रीत मनातली प्रीत
सगळ्याचा विचार करायचाय मला

म्हणुनच अपेक्षा करत राह्ते
तुच काहीतरी बोलण्याची
खर तर मीही वाट बघतये
तुला प्रतिसाद देण्याची

माझे शब्द नाहीत महत्वाचे
भावना तर कळाल्या ना तुला
सगळ्याच गोष्टि सान्गता येत नाही
थोडस समजुन घे की रे मला

Monday, 30 April 2012

asech

कोण आपलं ,कोण परकं ,
शब्दांचे खेळ नुसते ...
कोण आपली साथ देइल,
याची पण एक वेळ असते.


बोलायला गेले तर
आयुष्य पूरणार नाही
मनातले सारे सांगायला
शब्द उरणार नाही


तुझ्यासाठी पापण्यांच्या
रोज ओलावती कडा
आठवांच्या ओंजळीत
तुझा प्राजक्ताचा सडा

नांदे नेहमी श्रावण
माझ्या पापण्यांच्या काठी
आसवांनी भारलेले
दोन डोह तुझ्यासाठी

पाऊस

दारावर बेल वाजली..

दार उघडून पाहतो तर बाहेर
कुणीच नव्हतं..
फ़क्त जोराचं वारं सुटलं होतं..

थोड्यावेळाने पुन्हा बेलचा आवाज..

दार उघडलं.. .. बाहेर कुणीच नाही...

... विचार करत करत आत येवून बसलो
आणि पुन्हा बेलचा आवाज...

आणि एकदम लक्षात आलं..
हसत हसत तिला आवाज दिला..
..
..
..
..

"अगं दार उघड बाहेर येवून...

तुला पाहिल्याशिवाय
बरसायचा नाही पठ्ठ्या...!! :)
 
 
 
*******************************
 
बघ.. तुझ्या आठवणी इतक्या तीव्र
आहेत की
आकाश सुध्दा

ओघळत ओघळत

खाली येतं..... !!
 
 
 

वाळु

वाळुवर बनवलेली
दोन घरं मी स्वत:ची
एक ते लाटेत कोलमडलं
आणि दुसरं ते वाहुण गेलं
काय दोष द्यावा त्या लाटेला ?
वाळुवर घर बनवणं
ही गोष्ट्च मुळ चुकीची
कहाणी ही एका वेडया मनाची....................

पाऊस

तुझेच रोज व्हायचे प्रिया असे हळू हळू
नभात भेटती शशी निशा जसे हळू हळू

अता कुठे मला दिसे वसंत रोज पाहुणा
फुले फुलेच शोधती तुला कसे हळू हळू

तुला मिठीत घेउनी नभापल्याड जायचे
न भेटताच चांद तो प्रिया रुसे हळू हळू


**********************************


कोसळणारा पाऊस अस का वागतो?
प्रतीक्षेत तीच्या आभाळ फ़ाडून रडतो..

माझ्या डोळ्यात दाटलेला पाऊस पडत का नाही?
विचारले तर.... तूझ्या आसंवाच कारण सांगतो

:( :( :(

:) :) :)

प्रेम

प्रेम जर वेदना ! .. तर आपण का सूखावतो ?
प्रेम जर सुख ! .. तर आपण का दुखावतो ?
प्रेम जर पाणी ! .. तर आपण का जळतो?
प्रेम जर उब ! .. तर आपण का थरथरतो ?
प्रेम जर आनंद !.. तर आपण का रडतो?
प्रेम जर शाश्वत!.. तर आपण का मरतो ?
म्हणुन ....
प्रेम हे प्रेम असावे. ती मजबूरी नसावी
तुझे प्रेम नेहमीच माझी गरज असावी.

तुझे आणि माझे नाते

तुझे आणि माझे नाते
आज अचानक भल्या पहाटे
एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध
आपसूकच दाखवून गेली

सांग ना !
काय तुझे आणि माझे नाते
उमजेल का, कधी मला ते

... करून करून विचार जेव्हा
कधी नव्हे ते थकलो
गालांवरचा पाऊस मी
थांबवू नाही शकलो

मॆत्रीचे हे नाते अपुले
का आज एकतर्फी वाटले
पहाटेच्या या ऒल्या शणी
का कातरवेळ्चे ध्यास लागले

माझ 'मी"पण !! आठवणी

माझ 'मी"पण !!
परत तुझ्या मधाळ,
वेडावणाऱ्या ...स्वप्नाना भुलून,
कि कधीच नव्हते जे माझे ,
त्या मनाची खोटीशी समजूत घालून


आठवणी विसरण्याचा मी खूप प्रयत्न केला
पहिली विसरताच दुसरीत जीव गुंतत गेला...
आठवणीच्या धाग्यात माझा मीच वाहत आहे
धाग्याचे टोक आठवण्याचाच प्रयत्न आता बाकी आहे...

 
 
 

मन कधी कधी .........

मन कधी कधी .........

मन कधी फ़सत,मन कधी रुसत...
कुनाला हे कळत,कुणी उगाचच हसत..
हसताना मनात बरंच काही असतं...
सांगायला मात्र काही जमत नसत...
समजुन घ्यावं असं खुप वाटतं....
समजतय तिला हेही कळत....
शब्दांच्या शोधात मन हरवत...
न बोलताच मग डोळ्यांना समजत..
गालावरच्या खळीत उत्तर मिळतं....
पापन्यांखाली ते हळुच लपतं.........



मनाच रुसन फुगण रोजच..
मनाच आठवणीत हरवन रोजच ..
ज्याला ते कळत ..
मनाच त्याच्या माणसाशी नात जुळत ..
शब्दांशी मनाच काही केल्या पटत नाही ...
शब्दांशिवाय त्याच काही केल्या अडत नाही ..
अशा वेळी डोळेच मग साथ देतात..
आपोआपच तुझ्या हाताला स्पर्श माझे हाथ देतात

Wednesday, 4 April 2012

वाढदिवस

आज वाढदिवस आहे तुझा
बघ माझी आठवण येते का ?
सकाळ सकाळ आरश्यात बघ ,...
बघ माझी आठवण येते का ?
मोबाईल उचल, इनबॉक्स खोल ,
...बघ माझी आठवण येते का ?
तिथेही नाही दिसलो तर ,
ओर्कुट फेसबुक खोल ,
बघ माझी आठवण येते का ?
नाहीच दिसलो कुठे तर ,
जरा काळजात हात घाल ,
बघ माझी आठवण येते का ?
पिल्या पहिली  जागी तर हो ,
स्वप्नात पण मीच
मग आठवण येणारच.....
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

एकटेपणाची नशा.....!!

वाटतं...
चालत जावं....
आकाशाच्या भिंती ओलांडून....
नसलेलं असलेपण पाठंगूळी मारून....

... वाटतं....
विखरून जावं....
भोवतालचं भवंडलेपण...
उद्धृत वाटांच्या माथी मारून...

वाटतं...
कधी न कळावं....
नगण्य व्यवहारीपणाच्या...
शून्याचे घरंगळलेपण....

वाटतं....
कधी न कळावी...
वर्दळीची भाषा....
अन्‌ चढत जावी....

एकटेपणाची नशा.....!!
वाटतं...
चालत जावं....
आकाशाच्या भिंती ओलांडून....
नसलेलं असलेपण पाठंगूळी मारून....

... वाटतं....
विखरून जावं....
भोवतालचं भवंडलेपण...
उद्धृत वाटांच्या माथी मारून...

वाटतं...
कधी न कळावं....
नगण्य व्यवहारीपणाच्या...
शून्याचे घरंगळलेपण....

वाटतं....
कधी न कळावी...
वर्दळीची भाषा....
अन्‌ चढत जावी....

एकटेपणाची नशा.....!!

Monday, 2 April 2012

प्रवासी

जीवनाच्या वाटेवरचे आपण सारे प्रवासी
जग नावाच्या घरामधले तात्पुरते निवासी
कितीक आले कितीक गेले अमर नाही कोणी
आयुष्याभर साथ देती फ़क्त आठवणी.

एक विनंती आहे........

एक विनंती आहे........
दूरच जायचे असेल तर
जवळच येऊ नको,
busy आहे सांगुन टाळायचचं
असेल तर
वेळच देऊ नका.....

एक विनंती आहे....
चौकशी भरे,call,काळजी वाहू,sms
यांचा
...कटांळाच येणैर असेल तर
कोणाला नंबर
देऊ नका,....

एक विनंती आहे......
मौनर्वत स्वीकारायचं असेल
तर
आधी गोडगोड बोलूच नको...
Secrets share करायचीच
नसतील तर
मनाचं दार उघडूच नको.......

एक विनंती आहे......
माझ्या काळजी करण्याचा ञासच
होणार
असेल तर......
अनोळखी होऊनचं वागायचं
असेल तर
माझ्याबद्दल सगंळ जाणून घेऊचं
नको.........

एक विनंती आहे......
रागावून निघून जायचचं असेल
तर........
आधी माझ्याशी भांडूच नको....

एक विनंती आहे.....
मनातुन नंतर उतरवायचचं असेल
तर
मनात आधी भरुच नका.....

एक विनंती आहे........

एक विनंती आहे........
दूरच जायचे असेल तर
जवळच येऊ नको,
busy आहे सांगुन टाळायचचं
असेल तर
वेळच देऊ नका.....

एक विनंती आहे....
चौकशी भरे,call,काळजी वाहू,sms
यांचा
...कटांळाच येणैर असेल तर
कोणाला नंबर
देऊ नका,....

एक विनंती आहे......
मौनर्वत स्वीकारायचं असेल
तर
आधी गोडगोड बोलूच नको...
Secrets share करायचीच
नसतील तर
मनाचं दार उघडूच नको.......

एक विनंती आहे......
माझ्या काळजी करण्याचा ञासच
होणार
असेल तर......
अनोळखी होऊनचं वागायचं
असेल तर
माझ्याबद्दल सगंळ जाणून घेऊचं
नको.........

एक विनंती आहे......
रागावून निघून जायचचं असेल
तर........
आधी माझ्याशी भांडूच नको....

एक विनंती आहे.....
मनातुन नंतर उतरवायचचं असेल
तर
मनात आधी भरुच नका.....

शेवटची भेट

शेवटची भेट आपली
आजही आठवते
पुन्हा पुन्हा मनाला
तुझ्यासोबत पाठवते

काही आठवणी सुखाच्या
काही आठवणी दु:खाच्या
करून सारे गणित
उरणा-या शून्याच्या

जीवनाचे गोड चाँकलेट
चघळत चघळत खायचं असतं
शुल्लकश्या रागात,उगाच चरफ़डत
माधुर्य त्याचे नाकारायच नसतं

पायाखालची पायवाट
नेहमीचीच वहिवाट होते
चालताना जाणवत नाही
पण वाटेचीच लाट होते

तूझं मला आठवणं
माझं देहभर उजळण
कुणाची नजर न लागो
काळोखात पणतीचं लकाकण

मरण

मरण दाराशी आल्यावर,
मी म्हटलं, " तुला शंभर वर्ष आयुष्य आहे ..
मरण हि आश्चर्याने म्हणालं,
"अरे ! काय हा मनुष्य आहे...!!?

कविता म्हणजे नक्की काय????

कविता म्हणजे नक्की काय????

कविता म्हणजे प्रेमाचा जल्लोष...

कविता म्हणजे मैत्री मध्ये दिलेले वचन...

कविता म्हणजे स्वताचा आनंद....

कविता म्हणजे विरहात खाल्लेली हाय...

... कविता म्हणजे दुःखशल्य संघर्ष ...

कविता म्हणजे Do or Die

क्षण -- माझ्या मित्राची कविता

ती म्हणाली ......तू मला इतका कसा ओळखतोस,
कितीदा भेटलास मला की, माझ्या साठीच जगतोस....
आपण एकत्र घालवलेले क्षण किती थोड़े होते,
तरी का रात्रं-दिवस तुला माझीच 'आठवण' येते.

नीट पहिलेहि नसशील, तू मला डोळे भरून,
तरी मी छळते तुला का, रोज स्वप्नी येऊन?

हे असं होण शक्य तरी कसं आहे,
...नक्की माहित नाही, पण माझीही गत तीच आहे.

मी म्हणालो,..... अगं वेडे...
क्षण एकच पुरे होता, जो तुझ्या मुळे मी जगलो.

अन् कुणी सांगितलं क्षण ते दोघांचे थोड़े होते,
तुझ्या आठवणीने दिवस उगवतो, आठवणीनेच रात्र होते.

येता जाता उठता बसता क्षण न क्षण मी तुझाच असतो,
तुझ्या सवे गं सखये मी, नित्य नवा असा जगतो.

तुला दु:ख होतं तिथे अन्, आसवे मी गाळतो,
तुला लगते ठेच तिथे अन् पाय माझा रक्ताळतो.

तुला वाटेल का बरे हा नित्य माझ्यासाठी झुरतो,
मी म्हणेन अगं वेडे, मी तुझ्यावर प्रेम करतो....:)

रातराणीचा बहर,

तो रातराणीचा बहर,
करीतो हृदयावरती कहर.

पसरतो दर्प नशीला बहर,
चढवितो आसक्तीचे जहर.
...
झिंगते आसमंत चारो प्रहर,
उठे मग मनी अनोखी लहर.

जपे मन तो क्षण अन तो प्रहर,
असा तो रातराणीचा बहर.

रातराणीचा बहर,

तो रातराणीचा बहर,
करीतो हृदयावरती कहर.

पसरतो दर्प नशीला बहर,
चढवितो आसक्तीचे जहर.
...
झिंगते आसमंत चारो प्रहर,
उठे मग मनी अनोखी लहर.

जपे मन तो क्षण अन तो प्रहर,
असा तो रातराणीचा बहर.

Thursday, 23 February 2012

आयुष्य सुंदर आहे

मित्रानो ,
खरंच आयुष्य सुंदर आहे

सुर्य जेव्हा आकाशात
तळपत असतो रागाने ,
... इवलसं फ़ुल सांगतं त्याला
"पहा पण प्रेमाने !"

ढग जेव्हा दु:खी होतात
आणि बरसू लागतात धारा!
ढगाच्या दु:खावर तेव्हा
फ़ुंकर घालतो वारा !

चंद्र एकटाच पडतो आकाशात
दर्दभरी गात गाणी !
चांदण्या चमकत सोबत करतात
उत्साहाची भरुन वाणी!!

पानं, फ़ुलं, झाडं सारी
आपल्यासाठीच गात असतात ,
ओढे, नद्या, नाले, सागर
आपल्यासाठीच वहात असतात!

खरंच आयुष्य सुंदर आहे,
बघा जरा डोळे उघडून !
बघा एकदा तरी
आनंदाचं गाणं गाऊन !!

तिन्हीसांज

निळे निळे डोंगर असतात
गार गार हवा असते
नागमोडी वळण घेत
सडक आपल्याच नादात असते

... संध्याकाळची वेळ असते
प्रकाशाची धार जाते
पाखरांची भिरी
घराकडे परतत असते

तिन्हीसांज कशी असते ..?
जांभळ्या रंगात भिजत असते
झाडा -पानाना
गच्च आपल्या मिठीत घेते

आपले आणि परक्यांमधला फरक

आज कळाले आपले आणि परक्यांमधला फरक काय असतो,
आज कळाले जिव लावणारे आणि मज्जा घेणारे किति असतात ते.
शेवटि आपले पण काहि कामाचे नसतात,
ते पण फक्त स्वार्थि असतात.
ज्यांना आपले मानतो,
ते कधि आपले नसतात.
आणि खरे तर ज्यांना परके करतो,
तेच अशा वेळि कामाला येतात.
खरचं कधि कधि आपण किति चुकिचे वागतो,
नेहमि चुकिच्या व्यक्तिंवरच विश्वास ठेवतो.

स्वप्नात कुणाला असंही बघु नये

स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहीच नसावे

... ...कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी

कुणाचे इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमावण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अश्रू जमावी

कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे 'मी पण' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावे.

Sunday, 12 February 2012

माझ्यातला मी

माझ्यातला मी नेहमी तुझ्यात शोधात राहिलो
म्हणून स्वतालाही भेटायचं राहून गेल
दोन हृदय आणि आणि एक जीव कसे होणार
तरी वेड माझ मन सतत प्रयत्नात राहिलं