Saturday, 25 August 2012

आजही आठवतात ते क्षण..

तुझ्या सहवासातले,

कधी मी नजर चोरलेले,

तर कधी तू लपून पाहिलेले...



माहितीये मला कि तुझ्या हृदयावर आता दुसऱ्याच कोणाचा अधिकार आहे
पण माझ्या त्या गोड आठवणीतल्या तुझ्यावर फक्त माझाच अधिकार आहे ....



स्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते,
जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात,
तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत....



काहीतरी चुकतंय पण काय
सगळं निट सुरळीत सुरु असतांना
मन कशात तरी राहिलंय हरवलंय
आयुष्याची पहिली सुरुवात असतांना



जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल


 

No comments:

Post a Comment