Monday, 30 April 2012

पाऊस

तुझेच रोज व्हायचे प्रिया असे हळू हळू
नभात भेटती शशी निशा जसे हळू हळू

अता कुठे मला दिसे वसंत रोज पाहुणा
फुले फुलेच शोधती तुला कसे हळू हळू

तुला मिठीत घेउनी नभापल्याड जायचे
न भेटताच चांद तो प्रिया रुसे हळू हळू


**********************************


कोसळणारा पाऊस अस का वागतो?
प्रतीक्षेत तीच्या आभाळ फ़ाडून रडतो..

माझ्या डोळ्यात दाटलेला पाऊस पडत का नाही?
विचारले तर.... तूझ्या आसंवाच कारण सांगतो

:( :( :(

:) :) :)

No comments:

Post a Comment