Thursday, 23 February 2012

तिन्हीसांज

निळे निळे डोंगर असतात
गार गार हवा असते
नागमोडी वळण घेत
सडक आपल्याच नादात असते

... संध्याकाळची वेळ असते
प्रकाशाची धार जाते
पाखरांची भिरी
घराकडे परतत असते

तिन्हीसांज कशी असते ..?
जांभळ्या रंगात भिजत असते
झाडा -पानाना
गच्च आपल्या मिठीत घेते

No comments:

Post a Comment