ती म्हणाली मला
मला समजेल अस लिहित जा
तिच्या कडे बघत मनात म्हटल
तुझ्यावरतीच लिहिलेल असत
अग वेडे निट वाचत जा.....
*****************************************
मला एकदा थेंब व्हायचंय ......
तुला पाणी बनून स्पर्शून पहायचंय ...
मला एकदा थेंब व्हायचंय ......
तुझ्या गालावरून हळूच ओघळून पहायचंय.....
मला एकदा थेंब व्हायचंय ......
फक्त तुझ्यासाठी बनून रहायचय..........
*********************************************
चांदण्यांची रात्र सजली,
आठवणीत तुझ्याच राणी ....
कधी फुलते हसू ओठी,
कधी डोळ्यांत जमते पाणी ....
खिडकीतला हा अवखळ वारा,
चाहूल तुझीच देतो राणी ....
कधी गंध तुझ्या तनुचा,
कधी तुलाच मिठीत आणी ....
पावसाची रिमझिम ओली,
चिंब करी तुला राणी ....
कधी ओला मी तुझ्यासवे,
कधी ओल्या जाणीवा मनी ....
तूच तू एक तुझेच सारे,
तुझाच मी पण झालो राणी ....
कधी गुंतलो कसा कुठे,
कधी हरवलो न ठावे सजणी ....