Monday, 30 May 2011

कुणीतरी आहे ती ................

कुणीतरी आहे ती  ................
जी शब्दाविनाही माझे मन जाणणार
जगातले सर्वे सुख माझ्या पदरात टाकणार ------------------1

कुणीतरी आहे ती ................
जी कातरवेळी माझ्या मनास हळूच स्पर्शून जाईल
अन ओळख विचारताच नुसतीच  हसून देईल-------------------2

कुणीतरी आहे ती  ................
जी  स्वप्नांपालीकडील विश्व मला दाखवेल
आणी तिच्या  विश्वात रमताना मला स्वताचाहि विसर पडेल-------------------3

कुणीतरी आहे ती ................
जिच्याशिवाय सारे काही शून्य असेल
जिच्या सोबत सारे विश्वच स्वर्ग भासेल-------4

कुणीतरी आहे ती ................
जिचा असेल मला ध्यास
जिच्यासाठी जगण्याचा असेल माझा हव्यास .----------------5

कुणीतरी आहे ती  ................
जिच्या  प्रेमात मी असा  एकरूप होणार
जसे नदीचे पाणी सागरात विरघळणार-------------------6

कुणीतरी आहे ती  ................
जी  माझ्या पासून दुरावणार तर नाही ना
माझ्या आनंदी विश्वला संपवणार तर नाही ना--------------------7

अशीच कुणीतरी आहे ती  ................
जिची मी आतुरतेने वाट बघत आहे
माझ्या मनास का हि वेडी आशा छळत आहे ?------------------8

Friday, 27 May 2011

आठवणींचे पिंपळपान

वास्तवात भेटण्याची वेळ आमुची
नियतीने बहुदा ठरवली नव्हती
स्वीकारला होता निर्णय नियतीचा
नयनात मात्र प्रतिमा झळकत होती...

अनोखे बंधन आमुचे असे
जगास या कधी न कळले..
नयनात चेहरा ठेवुनी आम्ही
आठवणींचे पिंपळपान...आजही जपले....
************************************

तू अशीच आठवत जा
मी असेच लिहित जाईन
तुझ्या हरेक स्मृतीला
शब्दरूप मी देत राहीन


***********************
सतत नाराज आहेस काय विचारुन
मला नाराज करु नकोस
प्रश्नांची सरबती किती करशील
उत्तरांची अपेक्षा करु नकोस

Thursday, 19 May 2011

कधीतरी

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...

कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...

कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...

कधीतरी असा एक दिवस येइल,
प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...
पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,
कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...

कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...

कधीतरी तू मला असं वचन देशील?
पूढच्या जन्मी तरी माझी होशील?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,
आपण कोणावर तरी प्रेम करू शकलो यातच मग मला समाधान असेल...

-- तूझा आणि फक्त तूझा सनी

Wednesday, 11 May 2011

प्रेम आणि तू

ती माझ्या नजरेत नाही
पण डोळ्यात मात्र आहे...............
ती माझ्या स्वप्नात नाही
पण आठवणीत मात्र आहे..............
ती माझ्या सोबत नाही
पण हृदयात मात्र आहे...............
 
प्रेमाचे दुसरे नाव आहे विश्वास
तुझा प्राण तर माझं श्वास 
मी तुझ्यासाठी कुणीच नाही पण तू माझ्यासाठी आहे खास
म्हणूनच मी तूझा विश्वास आणि तू माझी आस
 
तुझ्या आठवणींच्या झाडाला
पुन्हा एकदा पालवी फुटतेय..
फळ म्हणून पुन्हा एकदा..
आसवेच बाहेर येऊ म्हणताय ...
 
 
मोहाच्या तळ्यात उतरताना मनाला कितीदा रोखतो
जाणीवाच्या पलिकडे जाऊन पुन्हा पुन्हा तेच करतो
 
मोहाच्या तळ्यात उतरताना मनाला कितीदा रोखतो
जाणीवाच्या पलिकडे जाऊन पुन्हा पुन्हा तेच करतो

Monday, 9 May 2011

तुझी आठवण

तुझ्या आठवणींच्या झाडाला पुन्हा एकदा पालवी फुटतेय..
फळ म्हणून पुन्हा एकदा.. आसवेच बाहेर येऊ म्हणताय ...


ही अखेरची तुझी आठवण
यापुढे माझ्या मनात
तुझे येणे जाणे असणार नाही...

यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं
माझ्या मनात बरसणार नाही.....

यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस
माझ्या मनाच्या अंगणात
रिमझिमणार् नाही....!

Friday, 6 May 2011

कधी वाटलंच नव्हतं..

जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..
अनोळखी नजरेनं अशा.. माझ्याकडे पाहशील..
पाहून नंतर.. हळूच मनाशी हसशील..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

...मनाच्या बागेत, भावनेचं रोपटं..
एवढ्या खोलवर जाईल..
मुळापासून उखडलं तरी..
थोडी आठवण शिल्लक राहील..
ती आठवण सुद्धा वेदनाच देईल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

तुझी निरागसता संपून..
निष्ठुरता डोळ्यांत उरेल..
माझ्या डोळ्यांत मात्र..
काकुळतीने.. पाणी तरेल..
भयाण हे स्वप्न, कधी वास्तवातही उतरेल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

ठसठसणारी वेदना..
तुझीच आठवण करुन देईल..
वेडं.. मनाचं पाखरु..
पुन्हा तुलाच शोधत राहील..
अवघड प्रयत्नानं त्याचा मात्र जीव जाईल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मी सुद्धा.. अडखळत..
पुन्हा उभा राहीन..
तुझ्या पलीकडे असणाऱ्या..
अंतिम ध्येयाला पाहीन..
आयुष्य पुढचे, त्याच्या चरणांवर वाहीन..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

आयुष्याच्या पानांवर पुढे..
प्रेमाचं पर्व अधुरंच राहील..
तुझ्या उल्लेखाशिवाय माझं जीवनसुद्धा..
अपुरंच जाईल..
मरताना सुद्धा ओठांवर तुझंच नाव घेत जाईन..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

Wednesday, 4 May 2011

पाऊस

चिंब भिजलेली ती,
अप्सरेहून सुंदर दिसते;
लाजून हळूच हसते,
अन काळजात घर करते...

जेव्हा जेव्हा पाऊस पडतो,
आठवणींचे दार उघडते;
तिच समोर दिसते,
अन मला चिंब करते.