Monday, 21 May 2012

हि रात्र

हि रात्र
हि रात्र मुली येतेय असंख्य स्वप्नांची फुलं घेऊन ..
अन गंध पसरतोय तुझ्या माझ्या मनात...

रातराणीच्या नाजूक गंधावर मात करत..
..हि रात्र दरवळू लागलीये ..

काजवे तार्यांशी स्पर्धा करू पाहतायत ..
पण तुझ्या नेत्रांतील चामकेशीही नाही..!

चंद्रकोर नेहमीप्रमाणेच हसतेय ..
पण तुझ्या मंद हसण्याचा कारण कळत नाही..
अन हि रात्र तुझ्यासह हसू लागली आहे ..

हि रात्र आता गडद होत चालली आहे..
तू असा माझा हात धरलास ...
..अन भर थंडीत हे शहारे उमटवलेस ...
..श्वास दुणावले ... पण क्षणभरच...!

आता मात्र.तूझ्या गुंफलेल्या बोटांत ..
...हवीहवीशी उब जाणवतेय..

वारा खेळतोय तुझ्या केसांवर ..
..अन तुझे केस माझ्या चेहऱ्यावर ..!
तू हळूच केस बांधून घेतेस..
..पण मी दुखावतो..
हि रात्र अशीच निशब्द राहू देत ..
मनाचा मनाशी संवाद चालू देत ..

..माझ्या खांद्यावर डोकं टेकवून डोळे मिटशील ...
-तुझा चेहरा फुलण्याची वाट बघत...
मी चेहरा निरखत राहीन.......................................

Wednesday, 16 May 2012

ती माझ्याशी बोलायची,

 

ती माझ्याशी बोलायची,
रोज गोड हसायची,
कधी कधी माझी
वाट बघत थांबायची....

दुसरी एकही मुलगी
माझ्याशी कधी बोलायची नाही,
ही पोरगी मात्र
माझी पाठ कधी सोडायची नाही....

तिच्या आयुष्यातल्या गमती
ती रोज मला सांगायची,
मी नवी लिहिलेली कविता
सारखी वाचायला मागायची....

एकदा मला म्हणाली
"तू माझ्यावर कध्धीच कविता करत नाही !"
तेव्हा मला समजलं....
तिला माझी एकही कविता कळत नाही

तो आणि ती

 

तो

नुसते सुचक बोलत राहतेस
पण प्रेम व्यक्त करत नाहीस
मी बोलायची वाट पाहतेस
स्वता काही बोलत नाहीस

माझ्यावर प्रेम करतेस तर
सान्गत का नाहीस एकदा मला
माझ मन जाणतेस तरी
कसली भीती वाटते तुला

पत्र अगदी प्रेमळ लिहीतेस
आणि म्हणतेस फ़क्त मेत्री आहे
पण खर काही वेगळच आहे
याची मला पुर्ण खात्री आहे

आता सोड ना हे लाजण तुझ
अन हाक दे माझ्या प्रेमाला
मनातले शब्द मनातच ठेवतेस
का छळतेस अशी सान्ग मला

ती

पुष्कळदा ठरवतेस सान्गाव तुला
पण मला धीरच होत नाही
मनातल सार मनातच राहत
ओठान्वर काही ते येत नाही

अशी कशी मी हाक देऊ
सोप वाटतय का ते तुला
जगाची रीत मनातली प्रीत
सगळ्याचा विचार करायचाय मला

म्हणुनच अपेक्षा करत राह्ते
तुच काहीतरी बोलण्याची
खर तर मीही वाट बघतये
तुला प्रतिसाद देण्याची

माझे शब्द नाहीत महत्वाचे
भावना तर कळाल्या ना तुला
सगळ्याच गोष्टि सान्गता येत नाही
थोडस समजुन घे की रे मला